“देवदास’ चित्रपटाला 16 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षितने ट्‌विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. संजय लीला भंसालीच्या या चित्रपटात तिने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या सेटवरील शाहरुखसोबतचा एक फोटो तिने पोस्ट केला. शाहरुखने त्यावर कमेंट करून माधुरीच्या अभिनयाचे कौतुक करताच ती लाजली.

देवदास हा नेहमीच माझा आवडता चित्रपट राहिला, असे ट्‌विट माधुरीने केले. त्यानंतर ही पोस्ट शाहरुख खान, संजय लीला भंसाली आणि ऐश्‍वर्या राय यांना टॅग केली. शाहरुखने लगेचच तिच्या फोटोवर कमेंट करत, तू नेहमीच माझी आवडती राहशील, तू नेहमी तीच असशील जिनं आम्हाला “”मार डाला” या शब्दांत माधुरीची स्तुती केली.

या स्तुतीमुळे लाजल्याचे दाखवत माधुरीने “इश्‍श…’ अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. माधुरी दिक्षीत, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांचा देवदास अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यातील पारो, चंद्रमुखी, आणि देवबाबू यांच्या भूमिकांनी चाहत्यांच्या मनात घरात केले आहे. दरम्यान, धकधक गर्ल अर्थात माधुरी दिक्षीत “बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून नुकतीच झळकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)