शाहरुखने इरफान खानला मदत केल्याचे वृत्त केवळ अफवा

लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेल्या इरफान खानला शाहरुखने मदतीचा हात दिल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे समोर आले आहे. इरफानच्या प्रवक्तांनीच याबाबत खुलासा केला आहे. इरफान खान आणि शाहरुख यांच्या भेटीच्या सर्व चर्चा खोट्या असून कोणत्यातरी एका व्यक्तीच्या डोक्यातील ही कल्पना अविश्वसनीय सूत्रांद्वारे व्हायरल केली गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपचारासाठी लंडनला जाण्याअगोदर इरफानने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखने इरफानच्या घरी जात त्याची भेट घेतली आणि तेव्हाच आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावी इरफान खानला दिली अशी बातमी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या दोघांमधील मैत्रीची खूपच चर्चा झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इरफान सध्या न्यूरोएन्डोक्रिन कर्करोगने ग्रस्त असून काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमधील उपचारादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. तसेच इरफानने चाहत्यांना एक भावनिक पत्रही लिहिले आहे. या संवेदनशील पत्रातून इरफान मानसिकदृष्ट्या खचल्याचं दिसत असून जगभरात जी मंडळी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांचं आभारही त्यानं मानलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)