शाहरुखची मुलगी करतीये ‘या’ स्टारकिडला डेट

शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडची सर्वात प्रसिध्द स्टारकिड्सपैकी एक असून, तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत दिसतेय. हे स्टारकिड्स फ्रेंड्ससोबत डिनर डेटवर गेले होते. त्यावेळेसचा हा फोटो आहे. यामध्ये सुहाना व्हाइट क्रॉप टॉप अँड रप्ड जीन्समध्ये दिसतेय. तर अगस्त्यसोबतच या फोटोमध्ये अजून दोन फ्रेंड्स दिसत आहेत. अगस्त्य हा श्वेता-निखिलचा मुलगा आहे.

दरम्यान सुहाना आणि अगस्त्य चांगले मित्र आहेत. दोघे एकमेकांना बालपणापासून ओळखतात. फक्त हे दोघंच नाही तर यांचे पालकही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गौरी-शाहरुख बरेच वेळा श्वेता नंदा आणि अमिताभ बच्चन, जया, अभिषेक, ऐश्वर्यासोबत इव्हेंट्समध्ये दिसत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)