‘शास्त्रोक्त भजन साधना आनंदी जीवनाचा अलंकार’

नाना चंदेले : कामगार भजन प्रशिक्षण शिबिराचा समारोप

पिंपरी – अध्यात्मामध्ये चारित्र्य संपन्न समाज घडविण्याची शक्ती आहे. त्यामुळेच शास्त्रोक्त भजन साधना आनंदी जीवनाचा अलंकार आहे, असे प्रतिपादन हभप नाना चंदेले यांनी केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या तेराव्या राजस्यस्तरिय कामगार भजन प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. जयंत करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे, संजय सुर्वे, संदीप गावडे व राज्यभरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. करंदीकर म्हणाले की, सुदृढ समाजाकरिता संतांच्या विचारांची आवश्‍यक्ता आहे. त्यांचे विचार दिशाहिन होऊ पाहणाऱ्या व्यक्तिंना सद्विवेकाच्या मार्गावर पोचवू शकतात. या संतांच्या विचारांचा भजनासारख्या माध्यमातून प्रसार होतो. बाळासाहेब गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. विजय शिंगाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी रुपेश मोरे, प्रदीप बोरसे, सुरेश पवार, अनिल कारळे,अविनाश राऊत, सुधीर रासे अरुण वाडकर, विवेक आरध्ये, परशुराम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)