शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्याने सांगवीकर मुग्ध

सांगवी – भारतीय शास्त्रीय संगीत नभातील सर्वांत तेजपुंज तारा मानले जाणारे स्व. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव पं. श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सांगवीतील संगीत रसिकावर सुरमोहिनी घातली. शास्त्रीय गायनाने भारावलेल्या सांगवीकर संगीत रसिकांना पूर्वा शहा यांच्या कथ्थक नृत्याने ही मंत्रमुग्ध केले. संगीत रसिकांना ही पर्वणी दिली सांगवीतील कलाश्री संगीत मंडळाने. मंडळाच्या वतीने कलाश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा दुसरा दिवस हा पं. श्रीनिवास जोशी आणि पूर्वा शहा यांनी अविस्मरणीय बनवला.

सांगवीतील कलाश्री संगीत मंडळ आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायनाने झाली. त्यानंतर पहिल्या सत्रात संदीप गुरव यांनी पुरीया कल्याण या रागामध्ये गावे गुणी हा विलंबित एकतालामधील ख्याल सादर केला आणि बहुत दिन बीते हा तीन तालामधील छोटा ख्याल सुरेल रित्या सादर केला. त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील घेई छंद मकरंद या नाट्यगिताद्वारे रसिकांना एक वेगळाच आनंद दिला. सोबतच माझे माहेर पंढरी या अभंगाद्वारे रसिकांच्या मनातील भक्‍तिचा ठाव घेतला. गुरव यांना हार्मोनियमवर प्रभाकरजी पांडव, तबला दशरथ राठोड,पखवाज गंभीर महाराज अवचार, टाळ सर्वेश बाद्रायणी तसेच तानपुऱ्यासाठी दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे यांनी साथसंगत केली.

त्यानंतर रुचिरा काळे यांनी शुद्ध कल्याण या रागात येरी माई पिया हा बडा ख्याल तर छोट्या ख्यालात नींद न आवत व सुनो सखीं री या बंदिशीचे गायन तसेच सुप्रसिद्ध दादरा दिवाना किए शाम क्‍या जादू डाला सादर केला. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे तर तबला साथ गणेश तानवडे यांनी व नम्रता महाबळ आणि धनश्री लोणकर यांनी तानपुरा साथ केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)