शास्ती माफीसाठी “शंखनाद’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफ करावा यामागणीसाठी सर्व प्रमुख विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या गुरुवारी (दि.31) महापालिका मुख्यालयासमोर अनोख्या पद्धतीने घंटानाद व शंखनाद आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत 9 जानेवारीला दिलेला शब्द पाळला नाही. ही मुदत 24 तारखेला संपली आहे. मात्र, प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे ही घोषणाही “गाजर’च निघाले. या आश्‍वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मत व्यक्‍त केले.
मारुती भापकर म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला लोकशाही मार्गाने विरोध करत असताना आमचा आवाज दाबण्यासाठी स्थानबद्धतेची कारवाई करणे हे हुकुमशाहीचे लक्षण आहे. आमचा आवाज दाबूनही मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्‍वासनाचीच खैरात केली. पिंपरी-चिंचवडकरांची ही घोर फसवणूक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मानव कांबळे म्हणाले की, दोन्ही आमदारांच्या आग्रहावरून शहरवासियांसाठी नववर्षाची चांगली भेट मिळेल, अशी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती. मात्र, या आग्रही मागणीला बाजूला सारून मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांची केवळ आश्‍वासनावर बोळवण केली. संजोग वाघेरे यांनी भाजपची सत्ता फसवी असून, केवळ आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेले केंद्र व राज्य सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे. तर युवराज दाखले यांनी या सरकारला त्यांची योग्य जागा दाखविण्याची भूमिका पिंपरी-चिंचवडकर नक्कीच बजावतील, असे म्हणाले.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्वराज अभियानचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी महापौर कवीचंद भाट, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते तात्या तापकीर, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, कॉंग्रेसचे संग्राम तावडे, संदीपान झोंबडे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, रवी यादव, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे, धम्मराज साळवे, अंजना गायकवाड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
यावेळी आंदोलकांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शास्तीकर माफ झालाच पाहिजे’, ‘भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणा आंदोलक देत आंदोलन केले. महापालिका मुख्यालय, पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शास्ती माफीच्या आश्‍वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांकडून शंखनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)