शास्ती’वरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

पिंपरी- शहरच नव्हे तर राज्यभरातील अनधिकृत बांधकामांना आकारल्या जाणाऱ्या शास्तीकराबाबत दिलासा देणार निर्णय घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्या दिवसापासून राष्ट्रवादीसह शिवसेना आणि मनसेने सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयासमोरच शास्तीच्या “काउंट डाऊन’चा फलक लावल्याने सत्ताधारी हैराण झाले आहेत. आता पत्रकार परिषद घेत, सभागृह नेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षांचा हल्ला परतवून लावत, त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 9 जानेवारी) रोजी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर विरोधकांनी शनिवार (दि. 12) पासून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे “काउंट डाऊन’ सुरु केले आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संपुर्ण शास्ती माफीची मागणी केली आहे. त्यावर सभागृह नेते पवार प्रत्युत्तर देताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीची घोषणा करण्याअगोदर विरोधक काय झोपले होते का?, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्यांना शास्तीकराची आठवण झाली का? असा सवाल उपस्थित करत पवार म्हणाले, शास्तीकर माफ करुन शहरवासियांना दिलासा देण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. युती सरकारने 600 चौरस फुटपर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यापुढील मालमत्तांचा देखील शास्तीकर माफ करण्याबाबत देखील सरकार सकारात्मक असून जनतेच्या हिताचा निर्णय घेईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शास्तीकर हा विरोधकांमुळेच नागरिकांवर लादला गेला आहे. ते पाप धुण्याचे काम आम्हाला करावा लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर शास्तीकर माफी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावेळी “काउंट डाऊन’ का केले नाही?. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराचा प्रश्‍न सोडविण्याची घोषणा केली असताना विरोधक “काउंट डाऊन’ करत आहेत. शास्तीकराचा विषय सरकारच्या अजेंड्यावर असून विरोधकांनी “काउंट डाऊन’चे काम करावे, आम्ही प्रश्‍न सोडविण्याचे काम करतो, असेही पवार म्हणाले.

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयाची अपेक्षा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शास्तीबाबतच्या आश्‍वासनानंतर शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच विरोधकांनी सुरु केलेल्या “काउंट डाऊन’मुळे सत्ताधारी भाजपवरील दबाव वाढला आहे. पंधरा दिवसांत शास्तीबाबत निर्णय न झाल्यास विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळणार आहे. त्यामुळे मंत्री मंडळाच्या बैठकीत शास्तीकराबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, अशी भाजप पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)