शास्तीकरात सवलतीचा प्रस्ताव

मान्यतेनंतरच मोकळा होणार अंमलबजावणीचा मार्ग

पुणे – शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अशा मिळकतींना पालिकेकडून तीनपट मिळकतकर आकारणी केली जात होती. हे कर आकारणी अधिकार राज्यशासनाने महापालिकेस दिल्यानंतर स्थायी समितीने उपसूचना देत 600 ऐवजी 1 हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना एकपट तर, त्यापुढील आकाराच्या मिळकतींना दीडपट दराने शास्तीकर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या शास्तीकराबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महापालिकेच्या नोव्हेंबरच्या सोमवारी होणाऱ्या मुख्यसभेसमोर ठेवण्यात आला आहे. मुख्यसभेच्या मान्यतेनंतरच या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने 2008 मध्ये कायद्यात बदल करून तिप्पट दर आकारणीची तरतूद प्रस्तावित केली होती. त्यानुसार कर आकारणी केली जात आहे. त्यातच ही तिप्पट आकारणी केल्याने अनेक मिळकतधारक कर भरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवर वर्षाला जवळपास 20 टक्के व्याज वाढते. ही थकबाकी कोट्यवधींच्या घरात आहे. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक झाल्याने ग्राहकांनाच हा दंडाचा भार सहन करावा लागतो. तसेच दंडाची रक्कम अधिक असल्याने अनेक नागरिक कर लावून घेण्यासाठी येतच नाहीत. परिणामी, महापालिकेचे उत्पन्नही बुडते. त्यामुळे राज्य शासनाने या बाबींचा विचार करून 2017 मध्ये या कायद्यात सुधारणा केली. तसेच जून 2017 पासून 600 चौरस फुटांच्या आतील मिळकतींना एकपट कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेनेही तत्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करत जून-2017 पासून नव्याने समोर येणाऱ्या अनधिकृत बांधकामांना 1 पट कर आकारणी करण्यास सुरूवात केली, तसेच 601 ते 1000 चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना दीड पट, तसेच 1 हजार चौरस फुटांपेक्षा बिगर निवासी (व्यावसायिक) वापर असलेल्या मिळकतींना तिप्पट तर निवासी मिळकतीला दुप्पट कर आकारणी केली जात आहे. मात्र, शासनाने दिलेल्या या आदेशाचा लाभ बिगर निवासी मिळकतींना मिळत नाही. तसेच शासनाने आता हे दर ठरविण्याचे अधिकार पूर्णपणे महापालिकेस दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)