शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – दीपक सावंत

औरंगाबाद : शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी शासन आग्रही असून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे सांगितले.वाल्मी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2018 डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला  महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार संदिपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर उपस्थित होते.

सावंत म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे.  शेती आणि शेतकरी यांचा दर्जा, गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी सर्वांनी कृतीशील प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खताचा आवश्यक तो पुरवठा सहजतेने उपलब्ध करुन दिला जावा.

-Ads-

तसेच बियाणे, खत यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर तत्परतेने कारवाई करण्यात यावी. भेसळ करणाऱ्यांविरोधार गुन्हे दाखल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतही औरंगाबाद जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केले आहे. ही समाधानाची बाब असून यावर्षी 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे.  याच पद्धतीने भविष्यातही शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना जास्त प्रभावीरित्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)