शासन निर्णय ; ई-पॉसद्वारे धान्य 1 एप्रिलपासून मिळणार

धान्य घेताना अंगठा देणे बंधनकारक

पुणे- येत्या 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्री दुकानांमध्ये आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टिमच्या (एईपीडीएस) माध्यमातून शिधा वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागाने सर्व दुकादारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करुन दिल्या असून या मशिनमध्ये नागरिकांच्या आधारकार्डची माहिती व अंगठ्याचा ठसा घेतला जात आहे. धान्य घेताना प्रत्येकवेळी नागरिकाला ई-पॉस मशिनवर आपल्या अंगठ्याच्या ठस्यांची जुळणी करुनच धान्य घ्यावे लागणार आहे. या सुविधेमुळे कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना धान्य मिळणार आहे.

पुणे ग्रामीण वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एईपीडीएस प्रणालीमध्ये नागरिकांच्या माहितीचे व अंगठ्यांच्या ठस्यांचे संकलन करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पुणे ग्रामीण भागातील सर्व नागरिकांची माहिती एईपीडीएस प्रणालीमध्ये संकलीत होणार आहे. त्यानतर एक एप्रिलपासून पुर्णपणे या प्रणालीद्वारेच धान्य वितरण करण्यात येणार आहे.
– नीलिमा धायगुडे, उपायुक्त, पुरवठा विभाग.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतील कारभार पारदर्शक व्हावे, प्रत्येक गरजू व्यक्तीला सरकारकडून देण्यात येणारे त्याच्या वाट्याचे धान्य मिळावे, स्वस्त धान्य दुकानात कोणत्याही प्रकारचा काळा बाजार होवू नये यासाठी अन्न पुरवठा विभागाने एईपीडीएस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी दिल्ली एनआयसीने एईपीडीएस ही संगणक प्रणाली निर्माण केली आहे. तसेच पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्री दुकानांमध्ये ई – पॉस मशिन उपलब्ध करुन दिले आहेत. एकदा ही माहिती घेतली, की सर्व डाटा सर्व्हवर होतो.

त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात धान्य खरेदी करायला गेल्यानंतर संबधित व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा मशिनवर घेतला जातो. हा ठसा जुळला की संबंधित व्यक्तीला त्याच्या नावावरील सर्व धान्य दिले जाणार आहे. या प्रणालीमुळे दुकानदारांना कोणत्याही प्रकारे चालखी करता येणार नाही. तसेच कोण दुकानदार किती धान्याचे वितरण करतो, याची माहितीही पुरवठा विभागाला मिळणार आहे. तसेच ई – पॉस मशीनवर व्यक्तीची सर्व माहिती उपलब्ध असल्याने यापुढे स्वस्त धान्य खेरदी कराला जाताना रेशनिंग कार्ड घेवून जाण्याची गरजही उरणार नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)