शासनाच्या वतीने पीएफधारकांना मिळणार सवलती

पुणे – पीएफच्या गुंतवणुकीत वाढ व्हावी आणि त्यामाध्यमातून कामगारांना लाभ व्हावा, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएफधारकांना अधिक सवलती देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, या समितीने देशभरातील पीएफच्या सर्व कार्यालयांकडून त्याबाबतचा अहवाल आणि सूचना मागविल्या आहेत. या अहवालाचा आणि सूचनांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे आगामी काळात पीएफधारकांना अधिक सवलती मिळण्याची शक्‍यता आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी तसेच खासगी कंपन्या आणि कारखान्यातील कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ व्हावा आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे जावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली होती. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची आणि लाभ देणाऱ्या कंपन्यांची संख्या हळूहळू कमी होत असल्याने ही योजना सर्वच आस्थापना आणि शासकीय कार्यालयांसाठीही सक्‍तीची करण्यात आली आहे. तरीही देशभरातील बहुतांशी खाजगी कंपन्या आणि कारखान्यांचे मालक तसेच कामगारही उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराच्या वेतनातून काही ठरावीक रकमेची कपात करण्यात येते, त्याच पटीत कारखानदार अथवा कंपन्यांच्या मालकाकडूनही तेवढ्याच रकमेची कपात करण्यात येते. त्यामुळे बहुतांशी कारखानदार अथवा कंपन्यांचे मालक ही योजना राबविण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे ही योजनाच धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे, या प्रकाराची भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या योजनेच्या माध्यमातून पीएफधारकांना अधिक लाभ देण्यात येणार आहे, त्यासाठी मागविण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती पीएफ कार्यालयाच्या समन्वयिका नीलम कुलकर्णी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)