शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा

प्रांताधिकारी अजित देशमुख : शासकीय विविध दाखल्यांचे वितरण

मंचर- गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी शासनाने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहेत. याची माहिती संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. तरच योजनेचे ध्येय पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा व भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अजित देशमुख यांनी केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना उपक्रमाअंतर्गत शासकीय दाखल्यांचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, तहसीलदार सुषमा पैकेकरी, प्राचार्य विलास फसाले उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले की, कोणत्याही कृतीमध्ये यश हवे असेल तर सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. आपली कृती मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक उर्जा एकवटली तर कोणतेही अवघड काम आपण सहजपणे करु शकला.
प्राचार्य नानासाहेब गायकवाड म्हणाले की, यशाचा मार्ग नेहमी खडतर असतो आणि त्यावरुन चालण्यासाठी मेहनत व जिद्द हवी असते. याच्या जोडीला शिष्यवृत्तीच्या रुपाने आर्थिक ताकद मिळाल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांबाबत जागरुक राहुन लाभ घ्यायला हवा. प्रास्ताविक विलास फसाले यांनी केले तर सी. बी. पिंगळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)