शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास प्रयत्नशील रहावे – बबनराव लोणीकर

परभणी : सेलु तालुक्यात राबविलेल्या समाधान शिबिराच्या उपक्रमाचा आढावा घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले.समाधान शिबिराच्या उपक्रमाचा पूर्वतयारी आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी  अधिकाऱ्यांना यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर आयुक्त विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे  उपस्थित होते.

शासनाच्या योजना ह्या सर्वसामान्य जनेतेचे जीवनमान उंचावण्यासाठी असतात. त्यांची चांगली अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची आहे. यासाठी समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे . सेलु तालुक्यात चांगले काम झाले. चांगले काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे सांगून लोणीकर यांनी यावेळी  19 एप्रिल रोजी परभणी येथील मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात ई-भूमिपूजन होणार असून अधिकाधिक लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)