शासनाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात कॉंग्रेसचा ठराव

पुणे – प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चौथ्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली. याचा निषेधाचा ठराव माजी आमदार व प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी मांडला.

जोशी म्हणाले, “प्रोटोकॉलप्रमाणे कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला देशाच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांना पहिल्या रांगेत बसविण्याची व्यवस्था मोदी सरकारने केली पाहिजे होती. परंतु सुडाचे राजकरण करणारे मोदी सरकार या कार्यक्रमातसुध्दा गांधी परिवाराच्या बाबतीत द्वेष दाखवून दिला.

या ठरावास अनुमोदन देताना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, जनसामान्यांमध्ये राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसविले. परंतु भाजपच्या या कृत्याला देशातील 130 कोटीची जनता पुढच्या काळात योग्य ते उत्तर देतील. निषेधाचा ठराव शहराध्यक्ष रमेश बागवे, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांनुमते मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)