शासनाकडून 5 लाखांची मदत – तावडे

नगर,  (प्रतिनिधी)- पावसामुळे निंबोडी जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली पडून झालेल्या दुर्घटनेत मृत तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनामार्फत 5 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश ना. शिंदे यांनी दिले असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)