शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार पगार : चंद्रकांत पाटील

सांगली: येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, हे शासन महाराष्ट्रातील सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना आधार दिला आहे, असेही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, शेतीमाल विकल्यानंतर साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याने शासनाकडे 10 हजार, 20 हजार ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये ठेवायचे. त्यानंतर रकमेनुसार दर महिन्याच्या 5 तारखेला शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने ठराविक रक्कम जमा होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये जर शेतकऱ्याने 30 हजार रुपये ठेवले तर दर महिन्याच्या 5 तारखेला पत्नीच्या खात्यावर आरटीजीएसने 3 हजार रुपयेप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये जमा होणार. शेतकऱ्याने 50 हजार रुपये भरले तर प्रतिमाह 5 हजार रुपये प्रमाणे वर्षाचे 60 हजार रुपये पत्नीच्या खात्यावर जमा होणार. यामध्ये भरलेल्या रकमेपेक्षा 10 हजार रुपये जास्त त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारची योजना सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, अटल पेन्शन योजनेतून 18 वर्षांच्या तरूण शेतकऱ्याने दरमहा 210 रुपये भरायचे. या रकमेचे 60 वर्षांपर्यंत 1 लाख 3 हजार रुपये होतात. 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 5 हजार रुपये निवृत्तीवेतन, संबंधित शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही दरमहा 5 हजार रुपये, तर दोघांच्या मृत्युनंतर मुलाला साडेआठ लाख रुपये एकरकमी मिळण्याबाबत अटल पेन्शन योजना आहे. या योजनेतून राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांच्या हप्ता भरण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)