शासकीय विश्रामगृहात भारतीय संविधान दिन उत्साहात

नारायणगावला 1931 मध्ये झाली होती पहिली बहिष्कृत परिषद

नारायणगाव- नारायणगाव (वारूळवाडी) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 23 व 24 मे 1931 रोजी नारायणगाव येथील शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पहिली बहिष्कृत परिषद आयोजित केली होती. त्यामुळे ही वास्तू ऐतिहासिक असल्याने या ठिकाणी आज (दि.26) संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधान पुस्तकाचे पुजन करण्यात आले. यावेळी गणेश वाव्हळ, अशोक खरात, दिनकर जाधव, विनोद पायाळ, सियाराम कांबळे, अतुल सोनवणे, रोहिदास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. गणेश जनार्दन वाव्हळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शासनाने संविधान दिन साजरा करण्याबाबत जो अध्यादेश काढला आहे त्याचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते येथील कोनशिलेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पूजन करून संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिसाळ यांनी केले, प्रास्तविक गणेश वाव्हळ यांनी केले, तर आभार सचिन लोखंडे यांनी मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)