पुणे : शासकीय विभागीय ग्रंथालय स्थलांतराला मान्यता

पुणे – विश्रामबागवाडा येथील शासकीय विभागीय ग्रंथालय हे शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.विश्रामबागवाडा येथे असलेले हे महाराष्ट्र प्रादेशिक ग्रंथालय 1948 ते 1969 या कालावधीत महापालिकेकडून चालवले जात होते. 1967 साली राज्यसरकारने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम संमत केला. त्या अधिनियमातील तरतुदीनुसार विभागवार विभागीय ग्रंथालय स्थापना करण्यासाठी 1969 साली पुणे विभागाकरिता महापालिकेकडे असलेले विश्रामबागवाडा येथील ग्रंथालय हस्तांतरण केले. तसेच त्याचे शासकीय विभागीय ग्रंथालय असे नामकरणही केले.

सध्या ग्रंथालयाकडे तीन लाख 56 हजार 570 इतकी ग्रंथसंपदा असून, सभासद संख्या 12 हजार 658 इतकी आहे. दैनंदीन वाचकांची संख्या सुमारे अडीचशे ते तीनशे इतकी आहे. त्यापैकी पन्नास टक्के वाचक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. सदर ग्रंथांचा संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन ग्रंथालयार्मात केले जाते. विश्रामबागवाडा ही सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची झालेली झीज आणि कमकुवतपणा विचारात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी या ग्रंथालयाचे तातडीने स्थलांतरण करणे आवश्‍यक होते. या संदर्भात शनिवार पेठेतील पुणे महापालिकेची न. वि. गाडगीळ शाळा ही नाममात्र भाडे करारावर देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. या शाळेत सध्या समाज विकास विभागाच्या योजनेंतर्गत प्रकल्प राबवण्यात येतात. या शाळेतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील प्रत्येकी 14 खोल्या आणि सभागृह 30 वर्षांसाठी ग्रंथालयाला देण्याला स्थायीने मान्यता दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)