शासकीय रुग्णालयात सांडपाणी व्यवस्थेची ऐशी-तैशी

सातारा – सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयातील सांडपाण्याच्या नलिका फुटल्याने यातील पाणी इतरत्र पसरत आहे. त्याचा वास सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे रूग्णालयातच आरोग्याच्या समस्या उद्‌भवत आहेत. यासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यावश्‍यक झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाला आरोग्याची संजिवनी असे समजतात. मात्र याच ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत रुग्णांची हेळसांड होत असल्याची परिस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पुरुष कक्षा शेजारील मोकळ्या जागेत अस्वछतेचे साम्राज्य पसरले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या रूग्णांच्या नातेवाइकांनी धूम्रपान करून थुंकण्याचे प्रकार होत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या पुरुष वैद्यकीय कक्ष, महिला तसेच इतर कक्षातील सांडपाणी वहन करणाऱ्या नलिका फुटल्या असून त्यांच्या दुर्गधीने जिल्हा रुग्णालयातील परिसरात घाण वास येत आहे. त्यामुळे याची स्वच्छता करणे व डागडुजी करणे आवश्‍यक बनले आहे. या सांडपाण्याच्या अव्यवस्थापणामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सांडपाणी व्यवस्थापनाची व्यवस्था की दुरावस्था हे तपासण्याचे काम कधी व कोण करणार असा प्रश्‍न आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यामधील गोरगरीब रुग्णाच्या हितासाठी शासकीय कार्यालयात प्रयत्न करताना आवश्‍यक त्या सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्‍यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घातल्यास जिल्हा रुग्णालयातील सांडपाणी व्यवस्थापन करणे सुलभ होईल. स्वच्छ सातारा म्हणून जिल्ह्याचा गौरव झाला आहे त्यामुळे स्वच्छता मोहिमांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे, मात्र प्रत्यक्षात शासकीय कार्यालयातच त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)