शासकीय योजनांचे अनुदान लाटू नका

नीरा – केवळ अनुदान मिळवण्यासाठी या शासकीय योजनांकडे पाहू नका. व्यवसायासाठी शेकऱ्यांच्या मुलांना कर्ज देण्यासाठी बॅंकांना निर्देश दिलेले आहेत. कर्ज घ्या पण जस घ्यालं तसच ते परत फेडाही, असे आवाहन पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

नीरा (ता. पुरंदर) येथे मंत्री जानकर यांच्या हस्ते मत्स्त्यव्यावसायीकांना अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन लंबाते, सुजाता दगडे, पिंपरेचे सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे, निरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, नितीन भोसले, विलास थोपटे, राजू थोपटे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, वसंतराव दगडे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यविभाग पुणेचे विजय शिखरे, मत्स्यविकास अधिकारी जे.एम भोसले यांच्यासह नीरा व पिंपरे परिसरातील ग्रामस्थ व मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते. यावेळी नीरेतील मात्स्यव्यावसायिक पंडीत चव्हाण यांना प्रशस्तीपत्र व अनुदान जानकर याच्या हस्ते देण्यात आले.
जानकर म्हणाले की, शेतकऱ्याच्या मुलांनी आता केवळ शेती करून भागणार नाही तर त्यांनी आता उद्योगपती व्हायला हवे तरच शेतकऱ्यांची प्रगती होईल. त्यामुळे आता तरुणांनी शेतीबरोबरच इतर उद्योग, व्यावसाय करण्याकडे लक्ष द्यावे. याकरिता शासनाने विविध नवीन योजना आणल्या आहेत, त्याचा लाभ घ्यावा. मत्स्यशेती करण्यासाठी शासनाचे अधिकारी गावात येवुन प्रशिक्षण देतील, त्याच बरोबर या व्यवसायाला लागणारे खाद्य स्वस्तदरात पुरवण्यासाठी शासनाच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार आहे, असेही जानकर यानी सांगितले. चव्हाण यानी केलेल्या शेततळ्याची पाहणी जानकर यानी केली, त्याच बरोबर चव्हाण याचे कौतुकही केले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन अनिल चव्हाण यानी केले आभार पंडीत चव्हाण यानी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)