शासकीय मदतीच्या बहाण्याने महिलेची लूट

जिल्हा रुग्णालयातील प्रकार; मंगळसुत्रासह मोबाईल केला लंपास

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)- शासनाकडून मिळणारी मदत मिळवून देतो असे सांगत जिल्हा रुग्णालयात एका महिलेला बारा हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका भामट्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष पाटील (रा.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंजना दिनकर मोरे (वय 46, रा. मसूर, ता. कराड) या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंगाच्या दाखल्यासाठी आलेल्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अपंगांना 12 हजार रुपये मिळतात, असे खोटे सांगत त्यासाठी जिल्हा न्यायालयात जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर न्यायालयात गेल्यानंतर तुमच्या अंगातील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल पाहिला तर तुम्हाला मदत देणार नाहीत.

त्यामुळे ते माझ्याकडे काढून द्या, असे संशयिताने सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवत तक्रारदार महिलेने संशयिताकडे 12 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व मोबाईल असा ऐवज दिला.

त्यानंतर कागदपत्रे तयार करायला जातो, असे सांगून संशयित तो ऐवज घेवून गेला. बराचवेळ झाल्यानंतरही पाटील येत नसल्याने महिलेने न्यायालयात त्याचा शोध घेतला. मात्र तो तेथे नव्हता. तो सिव्हील हॉस्पिटलमध्ये गेला असेल, असे वाटल्याने महिलेने सिव्हीलमध्ये जावून पाहिले. मात्र तो कुठेही सापडला नाही.

त्यामुळे मंगळसूत्र व मोबाईल घेवून आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. बुधवारी रात्री संतोष पाटील या नावाच्या व्यक्तीच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास स.पो.नि. सुनिल ठेकळे करत आहेत.

एसपींनी घेतली गंभीर दखल
सातारा शहरात दिवसाढवळ्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेची झालेली लूट गंभीर आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे या फसवणुकीची जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)