शासकीय निधीत घोटाळा: अजय राऊतला चार दिवसांची पोलीस कोठडी

कातरखटाव – वडूजचा मंडलाधिकारी अजय राऊत याला चार दिवस पोलीस कोठडी तर शाखा प्रमुख राकेश नायडूची न्यायालयीन कोठडीत रावनगीचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले.

खटाव तालुक्‍यासाठी 2015-16 साली आलेल्या खरीप हंगाम शासकीय निधीत घोटाळा केल्याप्रकरणी सध्याचा वडूजचा मंडलाधिकारी अजय राऊत याला रविवार दि. 27 रोजी उशीरा अटक करण्यात आली. सोमवार दि. 28 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करून उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी अजय राऊत याला पोलीस कोठडीची मागणी केली.

सरकारी अभियोक्ता नितीन गोडसे याचा युक्तिवाद ग्राह्य धरून राऊत याला शुक्रवार दि. 1 सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी तर एका बॅंकेच्या वडूज शाखेचा प्रमुख राकेश मुनास्वामी नायडू याला न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)