शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का
सातारा,दि.8 प्रतिनिधी- सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दूसऱ्यादिवशी साताऱ्यातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. संपामुळे कार्यालयातील कामकाज पुर्णत: ठप्प झाले होते त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा यापुर्वीच दिला होता त्यामुळे जिल्ह्यातील किती कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
संपाच्या दूसऱ्या दिवशी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये कामकाज बंद होते. कर्मचारी संपावर असले तरी अधिकारी मात्र कामावर हजर होते. मात्र, जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्णांचे उपचार सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे संपाचा फारसा फटका नागरिकांना बसला नसला तरी सरकारने संपाच्यापुर्वीच परिपत्रक काढून संप करणे गैरवर्तणूक असून संप केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र, तरी ही कर्मचारी संघटना संपावर ठाम राहिल्याने सरकार शिस्तभंगाची कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली असून उर्वरित विभागांमध्ये प्रमुख अधिकारी कारवाई करण्याची भूमिका घेणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच संपाच्या दरम्यान, काम बंद वेतन बंद या देखील धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले असल्याने कार्यालय प्रमुखांवर आता कार्यवाही करण्याची जबाबदारी असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)