शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता गृहात अस्वच्छतेचे साम्राज्य

तहसील कार्यालयातील तुंबलेली मुतारी आणि त्या परिसरातील वाढलेली झुडपे.

गोडोली, दि. 2 वार्ताहर – केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करून सुरु केले असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारी कार्यालयेच या अभियानापासून दूर राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या साताऱ्यात बहुतेक शासकीय कार्यालये असून विविध कामांसाठी जिल्ह्यातून रोज शेकडो नागरिक संबधित कार्यालयांमध्ये येत असतात. मात्र बहुतांश कार्यालयांची स्वच्छता गृहे दुर्गंधीने भरलेली आणि तुंबल्याने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे म. गांधी जयंती निमित्त एक दिवस स्वच्छता केल्याची छायाचित्रे प्रसिध्द करण्यात कितपत हशील आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षात स्वच्छता अभियानाचा जागर करताना शहरी भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले. त्याचाच कित्ता शासकीय कार्यालयांनी गिरवावा, अशी माफक अपेक्षा असताना लोकांमध्ये हे अभियान रुजवण्यात सातारा जिल्ह्यात तरी अपयश आल्याचे समोर येत आहे. जिल्हा परिषदेला देशात एक क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असले तरी अस्वच्छतेच्या विळख्यात प्रशासकीय इमारतीतील स्वच्छता गृहे अडकल्याचे दिसत आहे. जर सातारा जिल्हा परिषदेचा स्वच्छते बाबतचा डंका देशात वाजत असताना स्वाईन फ्लू आणि वाढते साथीचे आजार पाहता अन्य जिल्ह्यांची काय अवस्था असेल, हा प्रश्न निर्माण होतो. जिल्हा प्रशासनाला “फोटोपुरते धोरण आणि कार्यक्रम’ ही सवय लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रांत-तहसिल कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सातारा नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा शासकीय रुग्णालय, बसस्थानक, बाजार समिती तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये तरी नेटकी स्वच्छता असायला हवी. यासह शाळा-कॉलेजेस, विविध बॅंका आणि इतर महत्वाच्या कार्यालयांची अवस्था फार वेगळी नाही.
साथीच्या रोगांसह स्वाईन फ्लू ने जिल्ह्यात थैमान घातले असताना संत गाडगेबाबांचे नाव घेणारे अधिकारी “हातात खराटा आणि झाडू’ फक्त फोटोसेशन करण्यासाठी घेतात; हे म. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी मुबलक मनुष्यबळ आणि निधी शासनस्तरावरून दिला जातो. मात्र, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या साताऱ्यात शासकीय कार्यालयांची स्वच्छतेअभावी दयनीय अवस्था पाहता हा निधी जातो कुठे आणि मनुष्यबळ राबते कुठे या प्रश्नाच्या खोलात गेल्यास शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आलिशान बंगल्याप्रमाणे कशी सजलेली असतात, हे पहायला मिळते.

-Ads-

तहसिल कार्यालयात नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध दाखले काढण्यासाठी येत असतात. सेतू कार्यालयात नेहमी गर्दी असल्याचे दिसते. येथे महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने महीला वर्गाची कुचंबणा होते. येथे कामानिमित्त येणाऱ्या महिलांचा हा अत्यंत ज्वलंत प्रश्न सुटणार का? महिला प्रांत असताना त्यांच्या हे लक्षात का येत नाही, असे मत कमल मोहिते यांनी दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)