शासकीय कामांवरचा ट्रॅक्‍टर पकडला

बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी
वडूज, दि. 8 (प्रतिनिधी) – वडूज शहरातील बाजारपेठेत नगरपंचायतीच्या माध्यमातून शासकीय काम सुरू आहे. गटार बांधकाम कामासाठी खोदलेला राडारोडा,दगड,माती भरण्यासाठी उभा केलेला ट्रॅक्‍टर खातरजमा न करता तहसिलदारांनी तहसिल कार्यालयात आणल्याची घटना घडल्याने नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या वडूज शहरात विविध भागात गटार बांधकामांची कामे सुरु आहेत. यामुळे रस्त्याकडेला या कामांचे दगड,माती,बांधकामचे साहित्य पडले आहे. सध्या ते उचलण्याचे काम सुरू आहे. शनिवारी आठवडी बाजार असल्यामुळे शहरातील वाहतूक मुख्य बाजारपेठेतून वळविली जाते. त्यामुळे या बाजार पेठेतील रस्त्याच्या कडेला पडलेले साहित्य वाहतुकीस अडथळा ठरू नये म्हणून ते उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी नव्याने आलेल्या तहसीलदारांना त्या कामाजवळ उभा असलेला ट्रॅक्‍टर दिसला . यावेळी त्यांनी कोणतीही खातरजमा न करता कारर्यवाहीसाठी तो थेट तहसील कार्यलयात आणला.
अशा प्रकारे केलेल्या कारवाईमूळे शहरातील विविध विकास कामांना अडथळा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शासकीय काम करणाऱ्या वाहनां ऐवजी बेकायदेशीर गौण खनिज.वाळुची वाहतूक जी मंडळी करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)