शासकीय कामकाजात मराठी भाषा होणार आणखी सोपी

मुंबई : मराठी भाषेचा वापर वाढावा, विविध क्षेत्रात मराठी वापरात यावी,  यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-१ चे अॅप तयार केले आहे.

हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करता येणार आहे, तसेच शासन व्यवहारात तसेच न्याय व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीतून पर्याय देण्यासाठीभाषा संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या शब्दकोशांपैकी निवडक शब्दकोशांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मराठी भाषेतील संवाद वाढण्यास नक्कीच मदत होणार असून लोकांच्या शब्दसंग्रहात आणि ज्ञानातही वाढ होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)