शासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती

सरकारी आदेश पाळावा : पोलीस सह आयुक्‍तांचे आवाहन

पुणे – शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट सक्तीचा सरकारी आदेश पाळावा. आपणच कायदे तयार करत असल्याने त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन पोलीय सहआयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-

शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत वाट न पाहता सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटसक्तीचे पालन करावे. राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह इतर सर्व शासकीय कार्यालयातील नोकरदारांना हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे आवश्‍यक आहे. सरकारी नोकरदार हे कायदे तयार करतात. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी ही त्यांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिसांसह सर्व शासकीय नोकरदारांनी हेल्मेट, सीट बेल्ट वापरावा. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुण्यातील विविध कंपन्या मोठ्या संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरावे. यासाठी संपर्क साधला जाणार आहे हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित कंपन्यांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जाणार आहे. सरकारी कर्मचारी अधिकारी आणि मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे सुरू केल्यास सामान्य नागरिकही आपोआप याचा वापर करतील, असे सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले.

आज पुणेकरांची बैठक
हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी पुणेकर नागरिकांची मंगळवारी आनंद ऋषिजी ब्लड बॅंकेत सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)