शासकीय आदेश डावलून ल्हासुर्णेत पोल्ट्री सुरू

कोरेगाव ः प्रांताधिकार्‍यांना निवेदन देताना रमेश उबाळे शेजारी इतर आंदोलक.

रमेश उबाळे यांचे आजपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) – ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील हिम्मत मुगुटराव सावंत यांना पोल्ट्री बंद करण्याचा आदेश असूनही त्यांनी शासनाचे आदेश पायदळी तुडवून पोल्ट्री सुरू केली आहे. त्यामुळे 200 लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही पोल्ट्री दि. 30 ऑक्‍टोबरपर्यंत बंद न केल्यास या दि. 31 रोजी तहसील कार्यालयासमोर 60 कुटुंबांना घेऊन भजन आंदोलन करून निषेध व्यक्‍त करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला आहे.
निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे, दि. 12 जून रोजी आम्ही आपल्या कार्यालयात ल्हासुर्णे गावातील हिम्मत मुगुटराव सावंत यांची पोल्ट्री बंद करून 150 ते 200 लोकांचे आरोग्यास असणारा धोका टाळण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आपण सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल चौकशी व प्रत्यक्ष स्थळास भेट देवून पोल्ट्री बंद करण्याचा आदेश केला होता. हिम्मत मुगुटराव सावंत यांनी पोल्ट्री बंद करावी अथवा पोल्ट्री स्थलांतरीत करावी, असा आदेशात स्पष्ट उल्लेख केला होता. परंतु सावंत यांनी नाट्यमय प्रकाराने पोल्ट्री बंद केल्याचे भासवले व शासनाच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करून आपला दुर्गंधी व रोगराई पसरविणारा 200 नागरिकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळणारा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत. दरम्यान सुमारे 200 लोकांचे आरोग्य धोक्‍यात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजकीय हेतूने अशा लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, अशी अपेक्षाही रमेश उबाळे यांनी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)