शासकीय अधिकाऱ्यांच्या चमकुगिरीला चाप

सरकारी जाहिरातींमध्ये अधिकाऱ्यांचा फोटो वापरण्यास सक्त मनाई

मुंबई – विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातीत शासकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा फोटो वापरण्यास करण्यास मनाई करून सरकारने चमकेशांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे शासनाची सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे सरकारी जाहिरातीत मिरवता येणार नाही.

यासंदर्भात नगरविकास विभागाने अलिकडेच परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीरपणे दखल घेऊन संबंधिताच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. तसेच सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यत पोचवताना कोणताही अधिकारी जाहिरातीत स्वत:चा फोटो वापरणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सर्व विभागांना करण्यात आली आहे.

राज्य विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला होता.
अमरावती महापालिका क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले नसल्याचा आक्षेप घेत देशमुख यांनी गुडेवारांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली होती. त्यावेळी वित्त आणि नियोजन मंर्ती सुधीर मुनगंटीवार यांनी कोणताही अधिकारी राज्य सरकारच्या योजनेच्या संदर्भात स्वत:चा फोटो टाकून जाहीरात करीत असेल तर त्यांना सूचना देऊन दंड करण्याचा निर्णय सरकार घेईल, असे आश्वासन दिले होते.

तर शिस्तभंगाची कारवाई
नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख या सर्वांना सरकारी योजनांच्या प्रचार, प्रसार आणि जाहीरातीत स्वत:चा फोटो वापरण्यास मनाई केली आहे. नियोजन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)