शाश्‍वत विकासावर भारत भर देणार: कांत 

संग्रहित फोटो
नवी दिल्ली: 2018-2022 या काळासाठी शाश्‍वत विकास आराखड्यावर नीती आयोग आणि संयुक्‍त राष्ट्र (भारत) यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शाश्‍वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताची कटिबद्धता आणि प्रयत्न या करारातून प्रतिबिंबित होत आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक युरी आफान्सीव यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या. 2018-2022 हा काळ भारताच्या विकास गाथेसाठी महत्त्वाचा आहे. कारण 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.
सरकारी संस्था, सामाजिक प्रतिनिधी, शिक्षण तसेच खाजगी क्षेत्राशी चर्चा करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. दारिद्य्र निर्मूलन, नागरीकरण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, अन्न सुरक्षा आणि पोषण आहार, हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगारनिर्मिती, स्त्री-पुरुष समानता आणि युवा विकास या क्षेत्रावर यामध्ये भर देण्यात आला आहे. भारत आगामी काळात शाश्‍वत विकासावर भर देणार असल्याचे कांत यांनी
यावेळी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)