शाळेत सोडण्याच्या बहाण्याने विनयभंग

पिंपरी – मुलीला शाळेत सोडतो, असे सांगत दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला शनिवारवाडा येथे नेत तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या 50 वर्षीय वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी शौकत अजमेर शेख (वय-19) आणि अमोल चंद्रकांत इंगवले (वय-21, रा. पिंपळे निलख) या दोघांना अटक केली आहे. पीडित मुलगी गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी तयार झाली. त्यावेळी आरोपींनी तिला शाळेच सोडतो असे सांगितले.

पालक आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असल्याने पालकांनी मुलीला त्यांच्यासोबत जाण्यास परवानगी दिली. आरोपींनी तिला टेम्पोमधून शाळेत सोडण्याऐवजी पिंपळे निलख बस स्टॉप वरून शनिवारवाडा येथे नेले. या प्रवासादरम्यान आरोपींनी तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. मुलगी उशिरा घरी आल्यानंतर घरच्यांनी तिला उशिरा येण्याचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)