शाळेतील शिक्षकांचा सन्मान

जवळार्जून – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालय भाग शाळा पांडेश्वर विद्यालयातील शिक्षकांचा प्रशस्तीपत्र, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय प्राथमिक शाळा पांडेश्वर, प्राथमिक शाळा रोमनवाडी विद्यालयातील शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे, सामाजिक कार्यकर्ते आबूराव थिकोळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली जगताप उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक कुंडलिक कुंभार, रणजीत खरतोडे, प्रशांत प्रशांत माकर, प्रताप विरकर, गणेश सोनवणे, मोहिनी कापरे, मेघमाला सकुंडे, सोनाली काळाने, संजीवनी निंबाळकर, माधुरी दळवी, बाळासाहेब मेमाने व सागर शितोळे यांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)