शाळेतील विद्यार्थ्यांना ‘टेड टॉक्स’ ने प्रेरणा

नवीन संकल्पना, हटके विचार, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारे वक्ते यामुळे टेड टॉक्स या व्यासपीठाने जगभरात प्रसिद्धी मिळवलेली आहे.  जागतिक स्तरावर विचारांचे व्यासपीठ म्हणून टेड टॉक्स प्रसिद्ध आहे. जगभरातील यशस्वी मंडळींचे विचार काही मिनिटांत व्यक्त होण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील ऑरबिस शाळेमध्ये TEDxOrbisSchool या नावाने नुकतेच पार पडले.

वेगळी शैली, नेटके आयोजन आणि वक्ते यामुळे तरुणाईला नेहमीच आकर्षित करणाऱ्या या कार्यकमाची संकल्पना ‘आय थिन्क अँड देअरफोर आय एम’ अशी ठरविण्यात आली होती. याअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रीय असलेल्या आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या वक्त्यांचे विचार या वेळी विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले.

या मध्ये शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या व आय.आय.टी मुंबईचे विद्यार्थी असणाऱ्या श्री.नितीन रोडेकर यांनी ‘ ग्रामीण भागातील शिक्षण’ यावर आपले विचार मांडले. त्याच बरोबर ए.एफ.एम.सी चे ले.कर्नल शशिकांत शर्मा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ‘थिंक अॅज अ प्रोफेशनल’ हे सूत्र वापरले पाहिजे, या बद्दलचे मत त्यांनी सर्वांसमोर मांडले. श्री.आयुष वटाळ या १२वी ला असणाऱ्या विद्यार्थ्याने ‘विज्ञाना मागची कल्पना’ या वर तर कु. गोपिकाश्री संपतकुमार या तरुण विद्यार्थिनीनी ‘सेंसरशिपः एव्हर व्होलिंग: देन अँड नाउ’ या वर आपले विचार प्रकट केले. तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर व  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एन्थुसीएस्ट असणाऱ्या श्री.विनीत जैन यांनी भारतामधल्या ‘ह्युमनॉइड रोबोट्स अँड फॉर फ्यूचर’ या विषयवर आपले मत मांडले.

या प्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याधापिका माला जेठली म्हणाल्या की “ हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला, अर्थपूर्ण संभाषणांची  TEDxOrbisSchool ही तर एक सुरुवात आहे. अशाच प्रकारे शाळा गहन चर्चांमध्ये आपला सहभाग व योगदान देत राहील.” या पुढे त्या म्हणाल्या की “आम्ही त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमामुळे नव-नविन योजना राबवण्यासाठी एक सुंदर मंच उपलब्ध झाला. आम्हाला हीच आशा आहे की भविष्यात देखील अशा आयोजनामुळे नव्या व जुन्या ही विचारांना नक्कीच वाव मिळेल.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)