शाळेतील पाल्यांना फकिरा कादंबरीचे वाटप

सातारा ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सातारा पालिकेच्यावतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना फकिरा साहित्यकृतीचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी माधवी कदम व मान्यवर.

लोकशाहीरांच्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांचा उपक्रम
सातारा ता. 2 (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98 वी जयंती साजरी करताना सातारा पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पालिका शाळेतील गुणवंत पाल्यांना नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते फकिरा कादंबरीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, अण्णा लेवे, मिलिंद धडचिरे आणि शेखर कांबळे उपस्थित होते.
दिड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांना लोकशाहीर आणि साहित्यरत्न बिरुदावली लावली जाते. वंचित-उपेक्षित समाजाचे प्रश्न वास्तववादी लेखणी आणि पोवाड्यातून अण्णाभाऊंनी जगासमोर मांडले. म्हणूनच सातारा पालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या गुणवंत पाल्यांच्या फकिरा कादंबरी देताना आनंद होत असल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या उपक्रम स्तुत्य असून पुढील वर्षांपासून हा उपक्रम पालिकेच्यावतीने राबवण्याचे आश्वासन सौ. कदम यांनी दिले.

बोर्डिंग अथवा आश्रम शाळेत खाऊ आणि कपडे वाटप करण्याचे आयोजन सुरू असताना पिढी वाचनातून घडते, म्हणून फकिरा कादंबरी पालिका शाळेतील गुणवंत मुला-मुलींना वाटप करण्याचे निश्‍चित करण्यात आल्याचे मिलिंद धडचिरे यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)