शाळेच्या प्रवेशद्वारातून विद्यार्थ्याला घरी हाकलले

नृत्य, कराटे क्‍लासची शुल्क न भरल्याने शाळा प्रशासनाची कारवाई

पुणे – नृत्य व कराटे क्‍लासच्या शुल्काची उर्वरित रक्‍कम भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला शाळेच्या प्रवेशद्वारतून घरी हाकलून देण्याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी घडला. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत देणे बंधनकारक आहे. मात्र विमाननगर येथील व्हिसीटेक अॅकॅडमी शाळेने नृत्याचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याला वर्गात न बसू दिल्याची कारवाई केली आहे. याबाबत पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे.

-Ads-

राज्यातील दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये मोफत प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक शाळेमध्ये 25 टक्‍के जागा “आरटीई’ प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे अनिवार्य आहे. त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास मनाई आहे. या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्‍कम शासनाकडून शाळांना अदा केली जाते. मात्र तरीही अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून “आरटीई’च्या विद्यार्थ्यांकडून सर्रास शुल्क आकारले जात असल्याचे दिसून येत आहे.

जीवन विजय भोसले हा विद्यार्थी व्हिसीटेक अॅकॅडमीच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. त्याला कराटे व नृत्य क्‍लासचे 5 हजार रुपये भरण्यास शाळेकडून सांगण्यात आले होते. त्याच्या पालकांनी त्यापोटी 3 हजार रुपये शाळेत भरले होते. मात्र उर्वरित 2 हजार रुपये शुल्क न भरल्याने जीवन याला वर्गात बसू देण्यात आले नाही, अशी तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. या विद्यार्थ्यावरील अन्याय दूर करून संबंधित शाळेविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.

आरटीई प्रवेशित विद्यार्थ्याला शुल्क न दिल्याने वर्गात बसू न दिल्याची तक्रार आली आहे. सोमवारी सुटी असल्याने मंगळवारी पालिकेचे अधिकारी संबंधित शाळेत जाऊन याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

– शिवाजी दौंडकर, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण मंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)