शाळेचे यश शिक्षकांच्या कर्तृृत्वावर अवलंबून -डॉ. भाऊसाहेब कारेकर

निगडी – कोणत्याही शाळेला वा शैक्षणिक संस्थेला मोठ करणे, हे त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांच्या हाती असते. शाळेच्या यशात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांना शिक्षकाचे मार्गदर्शन अनमोल ठरते. शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो, तर सक्षम मुख्याध्यापक गाभा. कोणत्याही शाळेचे यश हे त्या शाळेतील गुणवंत शिक्षकांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, असे अल्प संख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले.

रूपीनगर येथील ज्ञानदीप माध्यमिक व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. चेअरमन सोपाराव फडके अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कमलाकर सातपुते, विद्यालयाचा माजी विद्यार्थी विशाल मानकरी, कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, अध्यक्ष धनाजी भालेकर, उपाध्यक्ष पंढरीनाथ जांभळकर, समन्वय समिती अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव भागवत चौधरी, खजिनदार दशरथ जगताप, प्राचार्य व पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भसे, सामाजिक कार्यकर्ते शरद भालेकर यावेळी उपस्थित होते.

-Ads-

यावेळी माजी विद्यार्थी मानकरी यांनी शाळेबद्दल ऋण व्यक्‍त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विविध गुण दर्शन कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते कला देवता नटराज मूर्ती व स्टेजचे पूजन करून झाली. निसर्ग संवर्धन, पर्यारण, अंध्दश्रध्दा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाव, लोकगीते, शेत समस्या, महाराष्ट्रातील दैवते यावर गाणी व नृत्य यावेळी सादर केली. प्राचार्य सूर्यकांत भसे यांनी प्रास्ताविक केले व कै. बाजीराव गारगोटे यांच्या कार्याचे स्मरण करून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. सुबोध गलांडे व शाळेतील मुलींनी सूत्रसंचालन केले. दयानंद सोनकांबळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)