शाळेची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाला 5 लाखांचा घातला गंडा

मंचर- स्वस्तात टाटा स्टिल मटेरियल देण्याचा बहाणा करुन मंचर येथील महात्मा गांधी प्राथमिक इंग्रजी माध्यम विद्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी लातुर येथून एकाला अटक केली आहे.

या प्रकरणी विद्यालयाची मुख्याध्यापिका सलमा महफुज शेख यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तुकाराम अंकुश शेवाळे (रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंचर येथील महात्मा गांधी प्राथमिक इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सलमा महफुज शेख यांनी तुकाराम शेवाळे यांना टाटा स्टिल मटेरियल देण्याकरीता 5 लाख रुपये रकमेचा आरबीएल बॅंकेच्या खात्याचा चेक दिला. शेवाळे यांनी शाळेसाठी अद्याप स्टिल मटेरियल किंवा 5 लाख रुपयांची रक्कम परत दिला नाही. आरोपी 15 ऑगस्ट 2018 पासून अद्यापपर्यत टाळाटाळ करीत होते. त्यामुळे अखेर शेख यांनी मंचर पोलिसांत तक्रार दाखल केली.

आरोपी शेवाळे हे लातुर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ यांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ, पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे, ए. एच. वाघमारे यांची टीम पोलीस निरीक्षक कृष्णा खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातुरला रवाना झाली. तेथे शनिवारी (दि. 23) सापळा रचून आरोपी तुकाराम शेवाळे यांना अटक केली. शेवाळे यांना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)