शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय रद्द

मुंबई – परिक्षेनंतर विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापनपूरक अभ्यासक्रमांचे वर्ग घेण्यासाठी राज्यातील सर्व शाळांतील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याच्या निर्णयाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या निर्णयाची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत हे आदेश तूर्तास शिक्षण विभागाने मागे घेतल्याची घोषणा केली. शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

परीक्षांचे निकाल लागेपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापनपूरक अभ्यासक्रमांचे वर्ग घेण्याचे आदेश महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने शाळांना दिले होते. या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या सुट्टीचे नियोजनच कोलमडल्याने पालकवर्गात नाराजी पसरली होती.
यासंदर्भात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विधान परिषदेत नियम 260 अन्वये आज शिक्षणविषयक चर्चा उपस्थित केली. एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांची सुट्टी वाया जाईल आणि शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोजा पडणार आहे, असा मुद्दा कपिल पाटील यांनी उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे विद्या प्राधिकरणाचे पत्रक आहे. मात्र यावर्षी ते मागे घेतले जाईल. ऐनवेळी कळवल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मात्र गुणवत्तेला बळकटी देणारा निर्णय असेल तर पुढील वर्षी जूनपासून तो अंमलात आणण्याचा विचार करू, असे सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)