शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण होणे गरजेचे – सत्यजित तांबे

संगमनेर – शाळा व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गावातील अत्यंत महत्त्वाची समिती असून तिचे सक्षमीकरण होऊन गुणवत्तेचे दृढीकरण व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.श्री खांडेश्वर सांस्कृतिक भवन, खांडगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती निशाताई कोकणे होत्या तर व्यासपीठावर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, कृषी व पशुसंवर्धचे सभापती अजय फटांगरे, पं.स. उपसभापती नवनाथ अरगडे, जि .प. शिक्षण समिती सदस्य मिलिंद कानवडे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या अचला जडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, जि.प. सदस्य रामहरी कातोरे, मिराताई शेटे, सिताराम राऊत, दत्तात्रय कोकणे, पं.स. सदस्य विष्णु रहाटळ, संतोष शेळके, अशोक सातपुते, सुनिताताई कानवडे, मधुकर गुंजाळ, रोहिणी गुंजाळ, सुनंदाताई भागवत यांसह तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,शाळांचे मुख्याध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी जि.प.प्रा. गि-हेवाडी शाळेच्या उत्कृष्ट लेझीम पथकाच्या संचलनाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उभारण्यात आलेल्या शैक्षणिक स्टॉलचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना तांबे म्हणाले की, पालक, विद्यार्थी, शिक्षक या तीन दुव्यांमध्ये असणारा समन्वयच मुलांच्या शैक्षणिक प्रगती साधण्यामध्ये उपयोगी ठरतो. पालकांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे. आपल्या गावातील शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी नागरीकांचे व पालकांचे सहकार्य महत्वाचे असते. शिक्षकांनी आपली मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावण्यात कोठे कमी पडू नये असे आवाहन तांबे यांनी  यावेळी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)