शाळा, महाविद्यालयात दरमहा 21 तारखेला “योग दिन’

विनोद तावडे यांची माहिती : किमान अर्धा तास योगा शिकवणार
मुंबई – संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला शाळा, महाविद्यालयात “योग दिन’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास योगा शिकवला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असे निर्देश शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.

विनोद तावडे यांनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांना योगासंदर्भात निर्देश दिले. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या. दरवर्षी 21 जून रोजी “योग दिन’ साजरा करीत असताना प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये “योग दिन’ साजरा करावा. या दिवशी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या 21 तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा, असे तावडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्‍यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मिशन वन मिलिअन’च्यावेळी राज्यभरात राबविण्यात आलेल्या अभियानाचे सर्व फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर योग दिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावे आणि त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार कण्यात यावे, अशी सूचना तावडे यांनी केली.

योग दिन फक्त 21 जून रोजीच साजरा करून उद्दिष्ट साध्य होणार नाही. तरी या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करणे आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यावर्षी 21 जून रोजी योग दिन शाळांमध्ये कशा पध्दतीने साजरा होणार आहे. यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती 16 जूनपर्यंत शिक्षण आयुक्तांना द्यावी, अशा सूचनाही तावडे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)