शाळा, महाविद्यालयांत क्रीडा शिक्षणावर भर हवा!

खासदार श्रीरंग बारणे : लोकसभेत केली मागणी

पिंपरी – देशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये केंद्र सरकारने आता क्रीडा शिक्षणावर भर द्यावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा सभागृहात केली.

-Ads-

देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विश्‍व विद्यालय मणिपूर येथे होत आहे. यापार्श्‍वभूमीवर लोकसभा सभागृहात चर्चा सुरू होती. यावेळी खासदार बारणे यांनी आपली भूमिका मांडली.

खासदार बारणे म्हणाले की, एक काळ असा होता की मुलांना घराबाहेर क्रीडांगण उपलब्ध होते व मुले विविध खेळ खेळत होती व खेळाविषयी आवड निर्माण होती. पण आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मुले मोबाईलवर खेळत आहेत. त्यामुळे मुलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच, महाविद्यालयाच्या बाहेर 10 पैकी 8 मुले मोबाईलवर वेळ वाया घालवत असतात.

यावर केंद्र व राज्य शासनाने शालेय जीवनापासून महाविद्यालयापर्यंत क्रीडा क्षेत्राला महत्त्व देवून अधिकाधिक सोयी पुरविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने केवळ 2 हजार कोटी रुपयांचे “बजेट’ क्रीडा क्षेत्रासाठी ठेवले आहे. वास्तविक, ही तरतूद कमी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडुने भाग घेतल्यानंतर त्याला सरकारी नोकरीची हमी देण्यात यावी तरच त्याचे मानसिक मनोदय वाढेल व तो खेळात रमेल, अशा विश्‍वासही बारणे यांनी व्यक्‍त केला.

संसदेत खाशाबा जाधव यांचा उल्लेख
खासदार बारणे यांनी कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा उल्लेख करून देशाला कुस्तीमधील पहिले ब्रॉंझ पदक कोल्हापूरच्या मातीतील मराठी कुस्तीगीर असणाऱ्या खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते. परंतु, नंतर अशा खेळाडुंकडे शासनाने दुर्लक्ष केले. आजही अनेक खेळाडू चांगले असून आर्थिक परिस्थितीमुळे उद्दीष्ट गाठू शकत नाहीत. खेळासारख्या क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे तसेच वशिलेबाजीमुळे अनेक चांगल्या खेळाडूंची निवड होत नाही. तो एक प्रकारे खेळाडुंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो त्यामुळे चांगला खेळाडू खचला जातो व खेळापासून दूर जातो. आजही ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी देश पातळीवरती चांगले प्रशिक्षक निर्माण करण्याची आवश्‍यकता असून त्या माध्यमातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पातळीपर्यंत स्पोर्टस्‌ अकादमीच्या माध्यमातून खेळाडू घडविले जातील आणि त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद सरकारच्या वतीने केली पाहिजे, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)