शाळा परिसरातील रोमियोंना कोण आवरणार?

निर्भया पथकाने टवाळखोरांचा बंदोबस्त करायलाच हवा
सातारा-  सातारा शहरातील प्रमुख शाळा महाविद्यालये परिसरात काही दिवसांपासून टवाळखोरांमुळे मुलींना येता जाता मानसिक त्रास सहन करावा लागत असून निर्भया पथकाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे. मुलीं महिलांना निर्भय बनुन शिक्षण तसेच इतरत्र निर्भयपणे वावरता यावं या उद्देशाने या पथकांनी काम केले. मात्र आता गेल्या काही दिवसापासून सातारा शहरातील प्रमुख शाळा भरताना तसेच सुटताना या टवाळखोरांचा वार वाढला आहे. महाविद्यालयांमध्ये मुलीचा पाठलाग करणे. घोळका करून बसणे, मुलींकडे पाहुन त्यांना लज्जा उत्पन्न होईल अश्‍या पध्दतीचे वर्तन करण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत मुली त्रस्त झाल्या असून त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. याच परिसरात भरधाव वेगात दुचाकी वाहने चालवणे,तसेच मोठ्या आवाजत हॉर्न वाजवत घिरट्या घातल्या जातात. काही मंडळी तर चारचाकी वाहने हाकताना त्यामध्ये मोठ्या आवाजाची गाणी वाजवत शाळा महाविद्यालय परिसरात फिरतात.या टवाळखोरांचे वयही जास्त नाही.बहुतांश अल्पवयीनच आहेत.पण विचित्र वेशभूषा आणि केशभूषा करुन तोडात काहीतरी चघळत ही मुले एकटक नजरेने मुलींकडे पहात असतात.या मुलांचे शाळा परिसरात काहीही काम नसताना शाळा सुटताना आणि भरताना ही मुले घोळक़्याने उभे राहतात आणि अनेकवेळा मुलींचा पाठलागही करतात.याचा मानसिक त्रास मुलींना होत आहे.

-Ads-

दैनंदिन स्वरूपात प्रत्येक शाळेतील शिस्तप्रिय शिक्षकाची नजर या टवाळखोरांवर असतेच. मात्र काही टवाळखोरांपुढें ते देखील हतबल ठरत आहेत.निर्भया पथकांने या टवळाखोरांच्या टोळक्‍याला जरब बवविण्याची मागणी शिक्षक, पालक व त्रस्त मुलींमधून जोर धरू लागली आहे.भरवस्तीतील शाळांच्या बाहेर विनाकारण उभे राहून रोमिओगिरी करणाऱ्या या टवाळखोरांना वेळीच जरब बसवली नाही तर त्यांचे धाडस वाढण्याची भिती आहे.निर्भया पथकाने कारवाईचा बडगा उगारुन शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना मोकळा श्‍वास घेउ द्यायला हवा

नवरात्रात प्रामुख्याने रास दाडियांचे विविध ठिकाणी आयोजन मोठया थाटात केले जाते. या ठिकाणी मुली महिला जास्त जमतात. याचा फायदा धेण्यासाठी टवाळांचे टोळके कायमच या परिसरांत फिरत रहाते. अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग देखील घडत असतात. त्यामुळे निर्भया पथकानश अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी साध्या वेशात उपस्थित राहून कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)