शाळा जगत

विमलाबाई लुंकड विद्यालयात महामानवाला वंदना
पुणे- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त विमलाबाई लुंकड विद्यालयामध्ये संविधानाविषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी मिळून एकता रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक एकतेविषयी घोषणा दिल्या. याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपण नाही, हे नाटक सादर केले. तर, शिक्षिका कांचन भरणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्याविषयी आधारित रचलेल्या कवितांचे वाचन केले. यावेळी गुलाबराव ओव्हाळ, दिपक डोंगरे, सतिश शिंदे, प्रकाश कुंबळे आदी उपस्थित होते.


नुमविमध्ये आंबेडकर जयंती साजरी
पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती नुकतीच शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी डॉ. बाबासाहेबां आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवे तरच, समृद्ध भारत निर्माण होईल, असे विचार मांडले होते. त्यांच्या विचारांचे आचरण आपणही करायला हवे, असे मत मुख्याध्यापिका ओमासे यांनी व्यक्‍त केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सरिता गोखले, अध्यापक एच. एम. नलावडे, विष्णू शेळके, सुषमा तुरबतमठ, वंदना पवार, वैशाली लेणे यांनी आपल्या विचारातून महामानवाला आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रशालेचे सर्व पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिक्षकांसाठी शुद्धलेखन, हस्ताक्षर कार्यशाळा
पुणे – सोमवार पेठ येथील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे मराठी माध्यमातील प्राथमिक, माध्यमिक, रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी शुद्धलेखन, हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वर्धा येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजीव लाभे यांनी शिक्षकांना सुवाच्च अक्षर, लेखनातील व्याकरणाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, लेखन शुद्ध व नीटनेटकं असावं यासाठी कोणते उपक्रम, कार्यकृती घेता येतील याचेही मार्गदर्शन केले. शुद्ध भाषा टिकवण्यासाठी, तिचे जतन करणे इतक्‍याच हेतूने नाही तर, भाषेची गोडी विद्यार्थी वर्गाला शालेय दशेतच लागली पाहिजे. तसेच भाषेवर उत्तम प्रभुत्व व आत्मविश्वासही ते प्राप्त करु शकतात, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्‍त करण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी व विद्याभारती यांच्या संयुक्‍त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुधन्वा बोडस, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते.


सणस विद्यालयात “शाळांगण’ प्रकल्पांतर्गत उन्हाळी शिबीर
पुणे – रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात, क्‍विक हिल फाउंडेशन व पंख संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने 9 वीच्या विद्यार्थ्यांकरीता “शाळांगण’ प्रकल्पांतर्गत उन्हाळी शिबीर मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. यावेळी प्रथम कार्यक्रमाची सुरवात अनिकेत यादव यांनी विद्यार्थांना शिवाजी महाराज आणि त्यांचे आरमार याबाबत चित्रफिती दाखवून केली. यावेळी इ 5 वीच्या अक्षय जोगदंड याने शिवाजी महाराजांची किर्ती आपल्या शब्दात मांडली. तसेच 12 वीतील ओंकार इंगवले याने ढोलकी वादनाने सर्वांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांचे जीवनकौशल्य वाढण्यासाठी “माती काम’ आणि “पेपर पिशवी तयार करणे’ या दोन कार्यशाळा राबविण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांना मातीपासून मडकी कशी बनवावीत याचे मार्गदर्शन गणपत दळवी यांनी केले तर, कागदी पिशवी कशी तयार करावी याचे मार्गदर्शन ज्योती काटीकर व श्वेता सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य शंकर शेटे, क्विक हिल सी. एस. आर प्रमुख अजय शिर्के, पंख संस्था संचालिका स्मिता आपटे, कल्याणी भाबड, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रकाश सबनीस, पर्यवेक्षक संभाजी पाटील, उर्मिला पाटील यांसह सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सलग 16 तास 35 मिनिटे वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन
आंबेडकर जयंतीनिमित्त लोकसेवा शैक्षणिक संकुलात वाचन स्पर्धेचे आयोजन
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि लोकसेवा इंग्लिश मध्यम स्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन स्पर्धा घेण्यात अली. या स्पर्धेमध्ये एकूण 155 विद्याघेतला. गायत्री शिंदे या विद्यार्थिनीने तब्बल 16 तास 35 मिनिटे एवढे सतत व सलग वाचन करून प्रथम क्रमांक मिळविला. धनश्री खेसे व श्रद्धा तारू यांनी द्वितीय आणि अरविंद आंधळे याने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांनाना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या रश्‍मी वासुदेवन, पूनमचंद भावसार, विजय मार्कंडवर, ज्ञानेश्वर कुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


पाच हजार विद्यार्थ्यांची डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक
पुणे – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (आझम कॅम्पस) वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 5 हजार विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीचे हे 14 वे वर्ष होते. राज्यघटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या देखाव्यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक विद्यार्थी विद्यार्थीनींने हाती घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ ऍड. प्रकाश आंबेडकर, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले. संस्थेतील सर्व धर्मातील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)