शाळा जगत

सणस विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

पुणे- रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील 9 वीच्या श्रीधर जाधव, प्रमोद जेजुरे, पूर्वा शिंदे, अभिषेक साळुंखे, प्रथमेश निकम, जान्हवी जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याविषयी माहिती सांगितली. विद्यालयातील उपशिक्षक दत्तात्रय खंडागळे आणि सुभाष राठोड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्‍त केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शेटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकर यांचे गुण आत्मसात करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लीना औताडे यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक प्रकाश सबनीस यांनी आभार मानले. पर्यवेक्षक संभाजी पाटील, पर्यवेक्षिका उर्मिला पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


पालकांकडून लवळे शाळेस एलईडी टिव्ही भेट
पुणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे येथील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय भित्तीपत्रक स्पर्धा, राज्य मंथन प्रज्ञा शोध परीक्षा, अशा विविध स्पर्धेतील उत्तम कामगिरीवर खुश होऊन पालकांनी लोकसहभागातून वर्गास स्मार्ट एलईडी टीव्ही संच भेट दिला. वर्गशिक्षक शुभांगी भालेराव – निघोट यांनी स्पर्धांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुणगौरव समारंभाचे औचित्य साधून पालकांनी मुख्याध्यापक शारदा दुबे यांच्याकडे टीव्ही भेट दिला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विजय केदारी, लवळे गावच्या सरपंच स्वाती गायकवाड, सदस्य वैशाली सातव, राणी आल्हाट, सविता गावडे, सर्जेराव तांगडे, राजाराम केदारी, कृष्णा सुर्वे, माजी मुख्याध्यापक बबन कुंभार, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेत संजय बनकर, महेंद्रकुमार खिलारी, माधवी रोडगे, अनुराधा लोंढे, वंदना दुर्गे, अंजना बनकर, अर्चना पोतदार, सुषमा जाधव, शुभांगी पिंगळे, उज्ज्वला कटकदौंड असे उपक्रमशील शिक्षक कार्यरत असल्याचे भालेराव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)