शाळा जगत

सणस विद्यालयाचे रयत प्रज्ञा शोध परीक्षेत यश
पुणे, दि. 25 – रयत शिक्षण संस्थेच्या, नारायणराव सणस विद्यालयातील इयत्ता 7 वी गुरुकुलमधील प्रणव बाबुराव कुबल या विद्यार्थ्याने रयत प्रज्ञा शोध परीक्षा 2018 मध्ये झालेल्या लेखी परीक्षेत यश मिळवत 8 हजार 954 विद्यार्थ्यांमधून त्याची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर शालेय जीवनात स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सणस विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते.
प्रणवला विद्यालयातील उपशिक्षक तानाजी खोमणे, संतोष राऊत, महेंद्र जोशी, दत्तात्रय कापरे, सचिन गवारी, सुनीता आभाळे, कविता गायकवाड व मनीषा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शेटे, उपमुख्याध्यापक प्रकाश सबनीस, पर्यवेक्षक संभाजी पाटील व उर्मिला पाटील, सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांनी प्रणव व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.


रानडे बालक मंदिरात गुढीपाडवा साजरा
पुणे – न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त नवीन खेळण्यांची पूजा करण्यात आली. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातून गुढी फिरवून आणली. यावेळी शाळेच्या पालकांकडून भातुकलीच्या खेळाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. लाकडी बाहुलीघर, स्टिलची, पितळेची भांडी, लहान मुलांच्या खेळाण्यातील अनेक वस्तू येथे मांडण्यात


नूमविमध्ये महामराठी भाषा स्पर्धा
पुणे – नूमवि प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महामराठी भाषा स्पर्धेत यश संपादित केले. यानिमित्त शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. मानस दळवी, अमरनाथ दोडके, सोहेल शेख, प्रथम शेडे, अभिषेक लिंबोरे, सुमित शेंडगे या बक्षीपास विद्यार्थ्यांचे कौतुक शिक्षण विवेक मासिकाच्या संपादिका अर्चना कुर्तडकर यांच्याकडून करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, पर्यवेक्षक आनंदा घोलप, शिवाजी कदम आदी यावेळी उपस्थित होते.


नवीन मराठी शाळेने दिला चिमुकल्यांना निरोप
पुणे – नवीन मराठी शाळेत नुकताच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्‍त केले. श्रावणी गोवांडे या विद्यार्थिनीने पेटी वाजवून दाखवली तर वैशाली जाधव मॅडमने गोष्ट सांगत गाणेही ऐकवले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्याबरोबरच तनुजा तिकोने, जयश्री खाडे, धनंजय तळपे आदी उपस्थित होते.


विमलाबाई लुंकड विद्यालयात गुणगौरव समारंभ
पुणे – गुलटेकडी येथील विमलाबाई लुंकड विद्यालयात नुकताच विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव समारंभ पार पडला. शाळेत घेण्यात आलेल्या बडबड गीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा परिसर स्पर्धा, आदर्श विद्यालय आदी सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण पार पडला. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे संतोष म्हस्के, नवमहाराष्ट्र विद्यलायाचे मुख्याध्यापक रेवणनाथ पवार आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षिका सुनिता पवार, संगीता चौधरी यांना तर विद्यार्थ्यांमध्ये रेहान मस्जिद सय्यद, साक्षी ढवणे यांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रला पालकवर्गही उपस्थित होता.


अँग्लो उर्दू हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड
पुणे – शिक्षणाची वारी प्रकल्पात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईझ हायस्कुलच्या प्रकल्पाची पुणे विभागीय स्तरावर निवड झाली आहे. मुख्याध्यापक परवीन शेख यांनी ही माहिती दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे उर्दू माध्यमिक विद्यालयांसाठी “तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर’ या विषयावर प्रकल्प मागविले होते. त्यात या प्रकल्पाची विभागीयस्तरावर निवड झाली. महंमद अली मुन्शी, बिलाल शाह, नौशाद सय्यद, जावेद पठाण या शिक्षकांनी परिश्रम घेतले. सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)