शाळा जगत

हुतात्मा राजगुरू विद्यालयात उन्हाळी शिबिराचे आयोजन
पुणे – पंख आणि क्विकहील फाऊंडेशनच्या शाळांगंण प्रकल्पांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिंनींसाठी एकदिवसीय उन्हाळी नाट्यशिबीर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पंख संस्था प्रमुख स्मिता आपटे, क्विक हिल फाउंडेशनचे सी.एस. आर प्रमुख अजय शिर्के, अभिनेते श्रीकांत यादव, अभिनेता शुभंकर एकबोटे आणि दिग्दर्शक व अभिनेता बॉबी हे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. “नाटक ही स्वतःचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडणारी आणि समाज एकत्र राहण्यासाठी आवश्‍यक कला आहे”, असे मत श्रीकांत यादव यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी नृत्य व नाटकाचे सादरीकरण केले. राजा दगडे, पायल जाधव, अनघा हरकरे, अनिकेत साठे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व राजगुरू गर्ल्स विद्यालयाच्या पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले. या पंख संस्थेच्या स्वयंसेवकांसमवेत या शिबिरासाठी विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.


शिक्षकांच्या मानसिक स्वास्थासाठी कार्यशाळा
पुणे- डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या नविन मराठी शाळेत शिक्षकांच्या मानसिक स्वास्थासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. फर्गसन महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे मुख्याध्यापक अनिल सावरकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. रागावर नियंत्रण ठेवल्याने प्रश्‍न सुटतात. समस्यांकडे कशा प्रकारे पहावे याबाबतही या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे शरद कुंटे, स्वाती जोगळेकर, मुख्याध्यापिका आभा तेलंग, दिपाली ठकार, कल्पना वाघ आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेला आहिल्यादेवी शाळा, नविन मराठी शाळा, रानडे बालक मंदिर, मा.स.गोळवलकर शाळा, एच.ए.स्कूल पिंपरी तसेच सांगली, सातारा, वाई या भागांतील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)