शाळा खोल्यांसाठी शिर्डी संस्थानने राजकारण न करता निधी द्यावा 

संदेश कार्ले ः सांडवे येथील जि.प.शाळा खोली बांधकामाचे भूमीपूजन
नगर – तालुक्‍यातील तसेच जिल्ह्यातील शाळा खोलांच्या बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी शिर्डीतील साईबाबा संस्थानने निधी द्यावा यासाठी शिवसेनेने आंदोलने केली. त्यामुळे संस्थानने या कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून करावयाच्या कामांसंदर्भात संस्थानने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिफारसीनुसार शाळा निश्‍चित कराव्यात. संस्थानच्या पदाधिकार्यांनी शाळा खोल्यांच्याबाबतीत राजकारण न करता मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी केले.
नगर तालुक्‍यातील सांडवे येथे जि.प.शाळा खोलीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी कार्ले बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती रामदास भोर, इंजिनइर प्रवीण कोकाटे, सरपंच आनंदीताई आरु, शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता भावसार, दिनेश करांडे, बाबासाहेब काळे, आबासाहेब कोकाटे, बाळासाहेब खांदवे, आजिनाथ शिंदे, धर्मा करांडे, अजय बोरुडे, ग्रामसेवक सागर खळेकर आदी उपस्थित होते.
सभापती भोर म्हणाले की, सांडवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार खोल्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुरेसा निधी उपलब्ध होवू न शकल्याने तूर्तास एकाच खोलीचे काम सुरु करण्यात येत आहे. भाजपा सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक चांगल्या योजना बंद केल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानवर भाजपाच्या पदाधिकार्यांचे वर्चस्व आहे. त्यांना शाळा खोल्यांचे बांधकाम आवश्‍यक असलेल्या शाळांची सविस्तर यादी पाठवली होती. मात्र केवळ राजकारणातून या यादीत परस्पर बदल करण्यात येत आहेत. शाळा खोल्यांच्या विषयात होत असलेले राजकारण दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)