शाळाबाह्य मुलांना मिळाले हक्‍काचे शिक्षण

खळद- आशा प्रकल्प, राज्य सरकारचा शिक्षण विभाग व खळद ग्रामस्थांनी चित्तोडिया लोहार समाजवस्ती येथील शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, आशा प्रकल्प शिक्षक मार्गदर्शक अनिल चाचर, तालुका समन्वयक अझर नदाफ, रोहित बोरावके, सुरेश रासकर, शंकर रासकर, अंकुश कामथे, अभिजित कादबाने, दत्तात्रय कामथे, गोरख कादबाने आदी उपस्थित होते. खळद येथे राजस्थान येथून स्थलांतरित होऊन आलेल्या चित्तोडिया लोहार समाजाने आपली वस्ती तयार केली आहे. या समाजाच्या वस्ती लगतच काही अंतरावर रासकर मळा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेतील शिक्षकांनी वारंवार या वस्तीला भेट देऊन मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)