शाळापरिसरात शिक्षक पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न

पतीविरुद्ध गुन्हा दाखल : घटस्फोट देण्यावरून वाद
पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष नामदेव चव्हाण (39, रा.धायरी) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 38 वर्षीय महिला जिल्हा परिषदेच्या नऱ्हे येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ती सहकाऱ्यासह शाळेच्या वर्गात जेवण करत बसली होती. यावेळी तिचा पती तेथे दाखल झाला. त्याने तिला “तुझ्याशी बोलायचे आहे, बाहेर चल’ असे म्हणत तिला वर्गाबाहेर आणले. यावेळी जिन्यामध्येच त्याने घटस्फोटाच्या दाव्यासंदर्भात न्यायालयात दाखल असलेल्या तारखेला का उपस्थित राहिली नाही, असा जाब तिला विचारला.

-Ads-

यानंतर अचानक हातातील पिशवीतून प्लॅस्टिकची बाटली बाहेर काढली. यामधील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून पेटलेली काडीपेटी तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काडी अंगावर न पडल्याने ती वाचली. यानंतर शिक्षिकेने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणतेही कामधंदे करत नसून त्याला दारुचे व्यसन आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. गडकरी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)