शाळांमध्ये घातली स्मार्टफोनवर बंदी, पण फ्रान्समध्ये

पॅरीस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये सरकारने शाळांत स्मार्टफोन वापरावर बंदी घातली आहे. मुलांमध्ये वाढत असलेले स्मार्टफोनचे व्यसन कमी व्हावे या हेतूने शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन शालेय वर्षापासून ही बंदी लागू होणार आहे. या संबधीचा ठराव फ्रान्सच्या संसदेनने मंजूर केला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा एलआरईएम पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. विरोधी पक्षांनी मात्र हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोप करत मतदानात भाग घेतला नाही.

स्मार्टफोनमुळे मुलांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून फ्रान्सच्या शिक्षणमंत्री जेन मिशेल ब्लॅनक्वेर दीर्घकाळ स्मार्टफोनवर बंदी घालण्याची मागणी करत होत्या. शाळांमध्ये स्मार्टफोनवर घातलेल्या बंदीचे स्वागत करून त्या म्हणाल्या, फ्रान्समधील या कायद्यामुळे इतर देशांनाही त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल.

नवीन कायद्यानुसार 15 वर्षापर्यंतच्या मुलांना शाळेत स्मार्टफोन, टॅबलेट आणि तत्सम गॅझेट्‌स स्विच ऑफ ठेवावी लागतील वा घरी ठेवून यावे लागेल. दिव्यांग मुलांना आवश्‍यकतेनुसार स्मार्टफोन वापरण्याची सवलत देण्यात येईल.
ब्रिटनमधील सुमारे एक तृतीयांश शाळांमध्ये शाळेत स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)